Quinton De Kock | क्विटंन डी कॉकचं शानदार शतक
लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार ओपनर क्विंटन डी कॉकने (Quinton De kock) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध शानदार शतक ठोकलंय.
नवी मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार ओपनर क्विंटन डी कॉकने (Quinton De kock) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध शानदार शतक ठोकलंय. क्विंटनने चौकार ठोकत सेंच्युरी पूर्ण केली. क्विंटनच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील दुसरं शतक ठरलं. (kkr vs lsg ipl 2022 quinton de kock scored century against kolkata knight riders at d y patil stadium at navi mumbai)
क्विंटनने 59 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने शतक झळकावलं. क्विंटन ठोकलेलं शतक हे या मोसमातील सहावं शतक ठरलंय. तसेच क्विंटन या मोसमात शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला. याआधी जॉस बटलरने या मोसमात 3 तर केएल राहुलने 2 वेळा शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे.
कोलकाताला 211 धावांचे आव्हान
क्विंटन डी कॉक आणि कॅप्टन के एल राहुल या सलामी जोडीने कोलकाताच्या गोलंदाजांची पिसं काढली. या दोघांनी 210 धावांनी सलामी भागीदारी केली. क्विंटनने नाबाद 140 धावा केल्या. तर केएलने नॉट आऊट 68 रन्स करत क्विंटनला चांगली साथ दिली. या दोघांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर लखनऊने कोलकाताला विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले आहे.
दोन्ही टीमची प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाइट रायडर्स : वेंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, टिम साउथी आणि वरुण चक्रवर्ती.
लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), एव्हिन लुईस, दीपक हुड्डा, मनन वोहरा, मार्कस स्टोयनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, मोहसिन खान, आवेश खान आणि रवी बिश्नोई.