KKR vs RCB Head To Head: इंडियन प्रिमियर लिगमधील यंदाच्या पर्वातील 9 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (KKR vs RCB) संघांमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला सामनाही या दोन्ही संघांमध्येच रंगला होता. यंदाच्या पर्वामध्ये पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झालेला कोलकात्याचा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवण्याच्या उद्देशानेच इडन गार्डनच्या मैदानावर उतरेल. तर दुसरीकडे या स्पर्धेत चांगली सुरुवात करणारा बंगळुरुचा संघ आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्याच्या उद्देशानेच हा सामना खेळेल. हे दोन्ही संघ या स्पर्धेमधील महत्तवाचे संघ असून कोलकात्याने 2 वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर दुसरीकडे बंगळुरुला एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. दोन्ही संघ तब्बल 31 वेळा या स्पर्धेमध्ये आमने सामने आलेत. त्यावेळी नेमकं काय घडलेलं, कोणाचं पारडं आकडेवारीनुसार जड आहे पाहूयात...


कोणी किती वेळा विजय मिळवला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 31 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी सर्वाधिक सामने ही कोलकाताने जिंकले आहेत. कोलकात्याच्या संघाने बंगळुरुच्या संघावर 17 वेळा विजय मिळवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकात्याला 14 वेळा धुळ चारली आहे. 


आयपीएलच्या पहिलाच सामना या दोघांमध्ये झालेला


दोन्ही संघांमधील पहिला सामना हा 2008 साली म्हणजेच पहिल्या पर्वात खेळवला गेला. हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला सामना होता. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅक्लमने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. त्याने 73 चेंडूंमध्ये 158 धावा केल्या. कोलकात्याने 222 धावांचा डोंगर उभारला होता. जितकी भन्नाट फलंदाजी केकेआरने केली तितकीच सुमार कामगिरी बंगळुरुच्या फलंदाजांनी केली. संपूर्ण संघ केवळ 82 धावांवर बाद झाला आणि हा सामना केकेआरने 140 धावांनी जिंकला होता.


2016 नंतर केकेआरचाच दबदबा


2016 पर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरोधातील प्रत्येकी 9 सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर कोलकात्याने पुढील पर्वांमध्ये झालेल्या 13 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले. मागील पर्वात झालेल्या दोन संघांमधील सामना आरसीबीने 3 विकेट्स राखून जिंकला होता. त्यामुळे यंदा केकेआर याचा बदला घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघ तोलामोलाचे असून आजच्या सामन्यात काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.


घरच्या मैदानाचा होणार फायदा?


कोलकात्याला घरच्या मैदानावर हारवण्याचं काम फारच कमी संघांना जमलं आहे. इडन गार्डन्सवरील सामन्यांमध्ये कोलकात्याच्या संघाला कायमच इतर संघांपेक्षा अधिक अॅडव्हानटेज असतो. मात्र बंगळुरुविरोधात या मैदानात कोलकात्याचा रेकॉर्ड फारसा समाधान करत नसल्याने सामना अटीतटीचा होईल असं चित्र दिसत आहे.