मुंबई : राजस्थान विरुद्ध कोलकाता झालेल्या सामन्यात एक खेळाडू हिरोचा व्हिलन बनला आहे. कोलकाताने 7 विकेटसने राजस्थानवर विजय मिळवला. राजस्थानचा स्टार खेळाडूमुळे सामना गमवल्याचं सांगितलं जात आहे. या खेळाडूची एक चूक महागात पडली आणि त्याची किंमत संपूर्ण टीमला मोजावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानचा 14 कोटींचा खेळाडू आपल्याच कर्मामुळे टीमसाठी व्हिलन बनला आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या चुकीचा फटका संपूर्ण टीमला बसला. संजूने धीम्या गतीनं खेळी केल्यानं त्याचा परिणाम टीमवर झाला. त्याने आयपीएलमध्ये 49 बॉलमध्ये 54 धावा केल्या. 


संजू सॅमसनने धीम्या गतीनं खेळल्यामुळे जास्त धावा करता आल्या नाहीत. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. कोलकाताने 7 विकेट्सने राजस्थानचा पराभव केला. संजूने 10 सामन्यात 298 धावा केल्या आहेत. 


आयपीएल 2022 मधील संजू सॅमसनचं हे दुसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने हैदराबादविरुद्ध 27 बॉलमध्ये 55 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी संजू सॅमसनला राजस्थानने 14 कोटी देऊन रिटेन केलं. संजू सॅमसन आयपीएल 2021 मध्ये कर्णधार म्हणून काही खास करू शकला नाही.