KKR vs SRH Final Washout Scenario: आज चेन्नईनच्या एम चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएलचा फायनल सामना रंगणार आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायजर्ड विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पावसाचं सावट असल्याची माहिती आहे. शनिवारी या ठिकाणी अचानक पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकात्याच्या टीमला प्रॅक्टिस सेशन मध्येच सोडून माघारी परतावं लागलं. शनिवारी, हैदराबादच्या खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता प्रश्न उपस्थित होतोय की, फायनल सामन्यात पाऊस पडल्यास कोणती टीम होणार विजयी? 


फायनल सामन्यात पाऊस आला तर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता KKR vs SRH फायनलबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतातय. जर आजच्या दिवशीही पाऊस पडला तर काय होईल? आयपीएल 2023 प्रमाणे आयपीएल 2024 फायनलसाठी रिझर्व डे आहे की नाही? असे सवाल चाहत्यांच्या मनात आहेत. पावसामुळे राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही, तर विजेता कोण होणार हे जाणून घेऊया. 


कोण होणार विजयी?


  • KKR vs SRH IPL 2024 फायनल सामन्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे एक रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. जर पावसामुळे सामना 26 मे रोजी पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार 27 मे रोजी सामना पूर्ण करण्यात येणार आहे. 

  • याशिवाय जर पावसाने आयपीएलच्या अंतिम दिवशी व्यत्यय आणला तर सामन्याचा निकाल देखील DLS पद्धतीने ठरवला जाऊ शकतो.

  • KKR विरुद्ध SRH फायनल मॅचच्या रिझर्व डेला देखील पाऊस पडला, तर अंपायर नियमित वेळेत किमान 5-5 ओव्हर्सचा सामना आयोजित करण्याचा विचार करणार आहे. 

  • पावसामुळे राखीव दिवशीही KKR विरुद्ध SRH अंतिम सामना खेळला गेला नाही, तर पॉइंट टेबलच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सला विजेता घोषित केले जाणार आहे. कारण कोलकात्याची टीम पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.


चेन्नईमध्ये कसं आहे आज वातावरण?


Accuweather च्या अहवालानुसार, KKR vs SRH फायनलच्या दिवशी म्हणजे 26 मे रोजी पावसाचा अंदाज नाही. परंतु वाचावरण ढगाळ असून कमी आर्द्रता असण्याची शक्यता आहे. याशिवाय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील रामल चक्रीवादळामुळे पावसाचा धोका नाकारता येत नाही.