लखनऊच्या विजयानंतरी के एल राहुल संतापला, टीमच्या खेळाडूंना सुनावलं
विजयाचा आनंद आणि समाधान नाहीच, के एल राहुलनं खेळाडूंवर काढला राग, पाहा नेमकं काय घडलं?
मुंबई : आयपीएलम 2022 च्या पंधराव्या हंगामात पंजाब विरुद्ध लखनऊ सामना झाला. या सामन्यात लखनऊने 20 धावांनी पंजाबवर विजय मिळवला आहे. लखनऊचा हा नववा विजय ठरला. मात्र या विजयानंतरही के एल राहुल आनंदी असल्याचं पाहायला मिळालं नाही.
लखनऊच्या बॉलर्स चांगली कामगिरी करत पंजाबला रोखलं. विजयानंतरही के एल राहुल खेळाडूंवर खूश असल्याचं दिसत नाही. पंजाबविरुद्धच्या विजयानंतर राहुलने याच खेळाडूंबाबत मोठं वक्तव्य केलं.
के एल राहुलने पंजाब किंग्जवर 20 धावांनी मिळवलेल्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिलं. मात्र फलंदाजांच्या कामगिरीबद्दल त्याने संताप व्यक्त केला.पहिल्यांदा फलंदाजी करत लखनऊने 8 बाद 153 धावा केल्या मात्र त्यांच्या गोलंदाजांनी पंजाबला 8 बाद 133 धावांवर रोखले.
के एल राहुल म्हणाला की फलंदाजांची कामगिरी अत्यंत वाईट होती. गोलंदाजांमुळे आम्ही हा सामना जिंकू शकलो. ही कामगिरी सुधारायला हवी. नाहीतर पुढे धोक्याचं ठरू शकतं. 160 पेक्षा जास्त धावांची अपेक्षा होती.
के एल राहुलनं कृणाल पांड्याचं तोंडभरून कौतुक केलं. याशिवाय के एल राहुलने गोलंदाजांचंही कौतुक केलं मात्र फलंदाजांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. लखनऊ टीमचा पंधराव्या हंगामातील हा नववा विजय आहे.