KL Rahul on Cheteshwar Pujara new vice captain : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN Test series) यांच्या टेस्ट सिरीज खेळली जाणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता केएल राहुल (KL Rahul) नेतृत्व करणार आहे. तर टेस्ट टीमचसाठी उपकर्णधारपदाची धुरा चेतेश्वर पुजाराकडे सोपवली आहे. दरम्यान बीसीसीआयने घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे सर्वच जण हैराण आहेत. यावर आता टीमचा कर्धणार के.एल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतकडून उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर टेस्टबाबत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)कडे धुरा दिली गेली. टेस्ट सामन्यापूर्वी के.एल राहुलची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी राहुलला, ऋषभ पंतकडून उपकर्णधारपद का काढून घेतलं, यावर प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर कर्णधाराने धक्कादायक उत्तर दिलं.


काय म्हणाला KL Rahul?


प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान बोलताना कर्णधार के.एल राहुल म्हणाला, उपकर्णधार म्हणून जे नियम आहेत, "त्याबाबत मला काही माहिती नाही. मी केवळ टीमद्वारे देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या सांभाळतोय. ऋषभ आणि पुजारा हे दोघंही चांगले खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू टेस्ट क्रिकेटमध्ये चांगले रन्स करतात. मी याबाबतीत जास्त विचार केला नाहीये. टीमच्या सर्व 11 खेळाडूंचा उद्देश हा सामना जिंकून देणं असतो." 


पुजाराकडे दिली उपकर्णधारपदाची धुरा


14 डिसेंबरपासून बांगलादेश (IND vs BAN) पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. यावेळी रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात के.एल राहुलला कर्णधारपद देण्यात आलंय. तर उपकर्णधार म्हणून बीसीसीआयने चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) नियुक्ती केली आहे. 


पुजाराचं करियर जवळपास संपण्याचा मार्गावर


चेतेश्वर पुजाराला उपकर्णधार पद देऊन बीसीसीआयने सर्वांनाच हैराण केलं आहे. बीसीसीआयने अशा व्यक्तीच्या हातात उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे, ज्याचं करियर आता संपण्याच्या मार्गावर आहे. या खेळाडूचा परफॉर्मन्स पाहता, त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता आहे. 


पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी


केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी.