KL Rahul : ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या सिरीजला आज सुरुवात झाली आहे. या सिरीजमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा केएल. राहुल ( KL Rahul ) याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. यावेळी पहिल्या सामन्यात राहुलने ( KL Rahul ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान यावेळी विकेटकीपिंग करताना के.एल राहुलने एक अशी चूक केली, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यामध्ये विकेटकीपिंग करताना केएल राहुलने ( KL Rahul ) चाहत्यांना फार निराश केलं. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना सूर्यकुमारच्या एका थ्रोवर कॅमरून ग्रीनला रनआऊट करण्याची पूर्ण संधी होती. मात्र कर्णधार केएल. राहुलने ( KL Rahul ) विकेटपाठी चूक केली आणि फलंदाजाला आऊट करण्याची संधीही गमावली. दरम्यान त्याच्या या चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. 


KL Rahul विकेटकीपिंगमध्ये कापलं नाक


ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडियाची काही खास फिल्डींग पहायला मिळाली नाही. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी फिल्डींग करताना बऱ्याच चुका केल्या. मात्र यावेळी विकेटकीपिंग दरम्यान अगदी साधे सोपे कॅच सोडून दिले. ऑस्ट्रेलियाच्या 22.1 ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. 



घडलं असं की, जडेजाच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमरून ग्रीनने एक्स्ट्रा कव्हर फिल्डरकडे शॉट खेळला. यावेळी रन घेण्यासाठी तो धावला. सूर्याने बॉल पकडला आणि केएल. राहुलच्या दिशेने फेकला. मात्र राहुलला बॉल पकडता आला नाही. कर्णधाराच्या या चुकीमुळे फलंदाजाला जीवदान मिळालंय. दरम्यान केएल राहुलच्या या चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. यावेळी धोनीला कॉपी करणं केएल.राहुलला महागात पडल्याचं म्हटलंय. 


शमीने घेतल्या 5 विकेट्स 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत 5 कांगारू फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलंय. या पाच विकेट्सच्या मदतीने शमी भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासात 93 वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनलाय. यावेळी त्याने न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टचा विक्रम मोडलाय.