दुबई : भारतीय संघाचा फलंदाज लोकेश राहुलने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले. धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीती घोषणा केली होती. 16 वर्षांची त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अनेकांना प्रेरणा देणारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या अधिकृत ट्विटर पेजवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल म्हणाला की, "धोनीबरोबर खेळणे हा माझा सन्मान आहे आणि दररोज त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे. ज्या आयुष्यभर आणि करिअरदरम्यान मी पाळेल. अनेकदा आमची क्रीजवर चांगली भागीदारी झाली आहे."


तो म्हणाला की, 'धोनीची शांतता आणि ज्या प्रकारे तो आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन घेतो. त्याच्याकडून प्रत्येक जण काहीना काही शिकतो.'


आयपीएलच्या आगामी 13 व्या सीजनमध्ये राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असेल. यंदा आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये करण्यात आले असून 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल रंगणार आहे.


केएल राहुल म्हणाला की, "अनिल भाईंनी मला खूप मदत केली आहे. मैदानाबाहेरही त्यांची मैत्री चांगली आहे. कारण आम्ही एकाच राज्यातून आहोत. त्यांनी कर्णधार म्हणून माझे आयुष्य अगदी सोपे केले आहे. मला माहित आहे की अनिल कुंबळे हे चांगली रणनीती बनवतील आणि मला फक्त मैदानात उतरून त्याची अंमलबजावणी करावी लागेल."