के. एल. राहुलवर टीका झाली, पण `या` एका निर्णयामुळे सर्वांकडून होतंय कौतुक!
खराब फॉर्ममुळे टीका होणाऱ्या राहुलने नेमका कोणता निर्णय घेतला ज्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.
Ind vs Ban 2nd test : बांगलादेशविरूद्धचे दोन कसोटी सामने भारताने जिंकत 2-0 ने बांगलादेशला (India vs Bangladesh) व्हाईटवॉश दिला आहे. भारताच्या 7 विकेट्स पडल्या असताना सामना बांगलादेशच्या पारड्यात झुकेल की काय असं वाटत असताना आश्विन, अय्यर खेळपट्टीवर टिकून राहिले. आर. आश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. या कसोटी सामन्यामध्ये कर्णधार के. एल. राहुलच्या एका निर्णयामुळे एका खेळाडूचं करिअर संपण्यापासून वाचलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (KL rahul praised jaydev unadkat after his performance played 12 years in indian team latest marathi sport news)
पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला बाहेर बसवत जयदेव उनाडकटला संधी दिली. आठ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपला बाहेर बसवणं कोणाच्याही पचनी पडणार नव्हतं. मात्र दुसरीकडे जयदेव उनाडकटला तब्बल 12 वर्षांनी पुनरागमन करणाची संधी मिळाली.
जयदेवने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आणि निवडकर्त्यांना त्याला संघात घेण्यास भाग पाडलं. नशीब म्हणजे त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं. हार न मानणाऱ्या या जिद्दी खेळाडूने सलामीला विकेट मिळवून देत सर्वांचं लक्ष वेधलं. जयदेवच्या पुनरागमनाच्या 12 वर्षाच्या या काळात त्याने घेतलेल्या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज झालं होतं.
दुसरीकडे कर्णधार राहुलने त्याला संघात स्थान दिल्याने त्याच्यावर टीका झाली. जर जयदेवला संघात स्थान मिळालं नसतं मिळालं तर त्याला आणखी किती वाट पाहावी लागली हे काही सांगता आलं नसतं. जयदेवने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. भारताने बांगलादेशवर 3 विकेट्सने विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये क्रमवारीत आपले स्थान बळकट केलं आहे