मुंबई : पंजाबचा सध्याचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज लोकेश राहुलचा बुधावारी वाढदिवस होता. त्याला सगळ्यांनी शुभेच्छाही दिल्या. मात्र पंजाबच्या संघाने त्याचा वाढदिवस वेगळ्याच स्टाईलमध्ये साजरा केला. आयपीएलच्या या सीझनमध्ये पंजाबचा संघ चांगली कामगिरी करतोय. नुकत्याच झालेल्या अटीतटीच्या सामन्यात चेन्नईला चार धावांनी पराभूत केले. संघानेही राहुलचा  वाढदिवस जल्लोषात साजरा केला. 


जल्लोषात केला राहुलचा बर्थडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी लोकेश राहुलचा बर्थडे पंजाब संघाने वेगळ्या स्टाईलमध्ये साजरा केला. राहुलच्या बर्थडे सेलिब्रेशनची व्हिडीओ क्लिप इन्स्टाग्रामवर शेअऱ करण्यात आलाय. यात गेलच्या तोंडाचा केक राहुलसमोर ठेवण्यात आलाय.



 


टी-२० स्पर्धेसाठी क्रिस गेल किती महत्त्वाचा आहे हे रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. चेन्नईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने खेळलेल्या खेळीने दाखवून दिले की पंजाबचा त्याला खरेदी करण्याचा निर्णय किती योग्य होता. या स्पर्धेतील पहिल्या दोन बोलीनंतरही क्रिस गेलला कोणी विकत घेण्यास तयार नव्हते. मात्र तिसऱी बोली सुरु असताना प्रीती झिंटाने दोन कोटींच्या बेस प्राईसवर त्याला खरेदी केले. 


रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास उतरलेल्या गेलने ३३ चेंडूत ६३ धावा ठोकल्या. त्याने लोकेश राहुलसह मिळून चेन्नईचे आक्रमण परतून लावले. राहुलने ३७ धावांची खेळी केली. मात्र गेलच्या खेळीने साऱ्यांची मने जिंकली. हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे वेगवान अर्धशतक आहे. याआधी त्याने १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.