नवी दिल्ली : श्रीलंकेच्या विरूध्द पहिल्या टेस्टमध्ये उत्कृष्ठ गोलंदाज असलेला भुवनेश्वर कुमार आपल्या लग्नामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता त्याच्या जागेवर तामिळनाडूचा ऑलराऊंडर विजय शंकर सहभागी होणार आहे. भुवनेश्वरच्या जागी दुसऱ्या टेस्टमध्ये शिखर धवन देखील टीममध्ये सहभागी होणार नाही. मात्र शिखर धवन तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सहभागी होणार आहे. दुसऱ्या टेस्ट नागपूरमध्ये २४ - २८ नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. दुसऱ्या टेस्टसाठी १४ खेळाडू असणार असल्याची घोषणा केली आहे. 


२६ वर्षाच्या विजय शंकरचा जन्म २६ जानेवारी १९९१ साली झाला. २०१४ मध्ये त्याने आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनी कॅप्टन असलेल्या चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये सहभाग घेतला होता. विजय शंकर आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये कमाल आहे. विजय शंकरने ३२ फर्स्ट क्लास मॅचमध्ये १६७१ धावा केल्या. यासोबतच ३२ विकेट देखील आपल्या नावावरून घेतल्या आहेत. तसेच इंडिया - ए की संघाकडून विजय शंकर मॅच खेळलेला आहे. 


ऑलराऊंडरची भूमिका साकारतो विजय शंकर 


विजय शंकर लेफ्टी असून तो मीडियम पेसर गोलंदाज आहे. विजय शंकर जरी आता पेसरमध्ये आपली ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला असला तरीही तो ऑफ स्पिन गोलंदाज देखील आहे. मात्र नंतर त्याने आपली स्टाइल बदलली आहे. 


विजय शंकरचे वडिल स्वतः क्रिकेटर होते. त्याचा भाऊ अजय तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या लोव्हर डिव्हिजनमध्ये क्रिकेट खेळला आहे. होम पिचवर रन बनवण्याचा चांगला खेळ आहे. तसेच ३२ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 


२०१७ मध्ये विजय हैदराबाद सनरायजर्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. या अगोदर २०१४ मध्ये आयपीएलमध्ये सर्वात अगोदर चैन्नई सुपर किंग्समधून खेळ दाखवला. आतापर्यंत तो फक्त एकच मॅच खेळू शकला आहे. राहुल द्रविड हा विजयचा आयडियल आहे. खासकरून राहुलने एडिलेडमध्ये खेळलेली २३३ आणि ७२ धावांची मॅच त्याला सर्वाधिक पसंद आहे. त्याचं असं म्हणणे आहे की अनेकदा त्याचा हा गेम मला प्रेरणा देत असतो. 


यावर्षी विजय तामिळनाडूचा कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्वनाखाली टीमने विजय हजारे आणि देवधर ट्रॉफी आपल्या नावावर करून घेतली. यो यो टेस्टमध्ये विजयचा स्कोर १८.५ असून बेंचमार्क १६.१ असा आहे.