नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन व्यतिरिक्त अन्य सहा कॅप्टन्सना आयपीएलच्या उद्घाटन समारंभात भाग घेता येणार नाही. आयपीएल फ्रॅंचायजी टीम्सच्या कॅप्टन्सना न बोलाविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय.


महत्त्वाचा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व ८ कॅप्टन ६ एप्रिलला विशेष व्हिडिओच्या शूटमध्ये भाग घेतील. त्यानंतर मॅचसाठी संबंधित शहरात रवाना होतील.


गेल्यावर्षीपर्यंत उद्घाटन सोहळा मॅचच्या आदल्यादिवशी व्हायचा, ज्यामध्ये कॅप्टन सहभागी व्हायचे. खेळ भावना जागृत ठेवण्याची शपथ याठिकाणी घेतली जाते.


दुसर्या दिवशी ४ फ्रॅन्चायजीच्या मॅच खेळविल्या जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल संचालन परिषदेत वरिष्ठांनी हा निर्णय घेतलाय. 


होमवर्कला वेळ


८ एप्रिलला मोहालीमध्ये ४ दिल्ली डेअरडेविअल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबदरम्यान तर ८ वाजता आरसीबी आणि केकेआर दरम्यान खेळविली जाणार आहे.


टीम्सना आपला होमवर्क करण्यासाठी पुरसा वेळ दिला जाणार आहे.