अँटिग्वा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेत मिळालेल्या भारताचा ११ धावांनी पराभव झाला. विडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने २७ धावांमध्ये पाच विकेट घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ १७८ धावांवरच ऑलआऊट झाला. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनीने अर्धशतक केले मात्र भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 


कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात केवळ ३ धावा केल्या. यावेळी पराभवाचे विश्लेषण करताना कोहली म्हणाला, खराब शॉट खेळल्याने संघाचा पराभव झाला. जिंकण्यासाठी संपूर्ण सामन्यात चांगली कामगिरी करणे गरजेचे असते. मला वाटले खेळपट्टी वेगवान आहे. 


यावेळी कोहलीने गोलंदाजांचे कौतुक केले. आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि त्यांना १८९ धावांवर रोखले. मात्र विडींजच्या गोलंदाजांनी काही डॉट बॉल टाकले आणि आम्ही विकेट गमावल्या.