जगातील टॉप १०० खेळाडूंमध्ये कोहली, धोनी
भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सलामीवीर रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी जगातील टॉप १०० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलेय. ईएसपीनने जगातील सक्रिय खेळाडूंची यादी जाहीर केलीये.
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सलामीवीर रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी जगातील टॉप १०० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलेय. ईएसपीनने जगातील सक्रिय खेळाडूंची यादी जाहीर केलीये.
कोहली या यादीत १३व्या स्थानी, धोनी १५ व्या स्थानी, युवराज ९०व्या स्थानी तर रैना ९३व्या स्थानी आहे.
पोर्तुगालचा फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर एनबीए स्टार लेब्रोन जेम्स, लिओनेल मेस्सी, रॉजर फेडररचा नंबर लागतो.
टॉप १०मध्ये मिकेलसन, नेयमार, उसेन बोल्ट, केविन ड्युरेंट, राफेल नदाल आणि टायगर वुड्सचा समावेश आहे.