केपटाऊन : द. आफ्रिकेचे दिग्गज ग्रीम पोलॉक हे दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघााकडून प्रभावित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवभारत टाईम्समधील बातमीनुसार, पोलॉक यांच्यामते केपटाऊनमध्ये सामना गमावणाऱ्या भारतीय संघाला या मालिकेत कमबॅक कायचे असेल तर विराट कोहलीला अॅटॅकिंग गेम खेळावा लागेल. कोहलीमध्ये तो X फॅक्टर आहे ज्याच्या जोरावर तो हवे ते रिझल्ट मिळवू शकतो. 


१९९२पासून मी येथे येणाऱ्या भारतीय संघाचा खेळ मी पाहतोय. सध्याच्या संघाकडून मी प्रभावित झालो. केपटाऊन कसोटीत संघाने ज्याप्रमाणे फाईट बॅक केले ते जबरदस्त होते. हार्दिक पांड्या नावाचा मुलगा तर भारतासाठी हिरा आहे. तो प्रत्येक चेंडूविरुद्ध लढला. 


जर कोहली दुसऱ्या डावात खेळपट्टीवर टिकला असता तर निकाल काही वेगळा असता. मी तिसरी कसोटी पाहण्यासाठी वॉंडरर्सला जाणार. भारत आणि द. आफ्रिका खऱ्या अर्थाने जगातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमाकांचे संघ आहेत, असे पोलॉक यावेळी म्हणाले.