दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वनडे रँकिगंमधील बॅट्समनच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आज आयसीसीची नवी रँकिंग जाहीर करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅट्समनच्या यादीत कोहलीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सचा नंबर लागतो. टीम इंडिया आयसीसीच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. उद्यापासून वेस्ट इंडिज दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होतेय.


या दौऱ्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५-० असा विजय मिळवल्यास टीम इंडिया दुसरे स्थान गाठू शकते. 


बॅट्समनच्या यादीत रोहित शर्मा आणि शिखर धवन संयुक्तरित्या दहाव्या स्थानी आहे. दरम्यान, बॉलर्सच्या यादीत टॉप १०मध्ये एकही भारतीय क्रिकेटर नाहीये. 


संघामध्ये भारत ११६ पॉईंट्सह तिसऱ्या स्थानी आहे तर ऑस्ट्रेलिया एका पॉईंटच्या आघाडीमुळे म्हणजेच ११७ पॉईंटसह दुसऱ्या स्थानी आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ५-० असा विजय मिळवल्यास भारत दुसरे स्थान मिळवेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकल्यास भारत चौथ्या स्थानावर येईल.