मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होता, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉनं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतानं टेस्ट सीरिज २-१नं गमावली तर वनडे आणि टी-20मध्ये ५-१ आणि २-१नं भारताचा विजय झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेत कोहलीचं नेतृत्व मी बघितलं. तो प्रमाणाबाहेर आक्रमक दिसला. विराटला संतुलन ठेवण्याची गरज आहे कारण टीममधला प्रत्येक खेळाडू त्याच्यासारखा व्यक्त होऊ शकत नाही. विराटचा कर्णधार म्हणून विकास होणं बाकी आहे, असं स्टीव्ह वॉ म्हणाला. रोमांच आणि भावनांवर नियंत्रण ठेवायला विराटला आणखी वेळ लागेल, असं स्टीव वॉला वाटतंय.


टीममधले इतर खेळाडू स्वत: सारखे नसतील हे कोहलीनं लक्षात घेतलं पाहिजे. रहाणे आणि पुजारासारखे खेळाडू हे शांत स्वभावाचे आहेत, अशी प्रतिक्रिया वॉनं दिली आहे. विराट टीमचं चांगलं नेतृत्व करतोय त्याच्याकडे करिश्मा आणि एक्स फॅक्टर आहे म्हणून इतर टीमनंही त्याचं अनुकरण करावं असं विराटला वाटत असेल. विराटला प्रत्येक फॉरमेटमध्ये टीमला पहिल्या क्रमांकावर न्यायचं आहे पण सध्याच्या क्रिकेटमध्ये ते शक्य नसल्याचं वॉ म्हणाला.


भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाच प्रबळ दावेदार असेल असा विश्वास वॉनं व्यक्त केला आहे. भारताचं भारतामध्ये जसं रेकॉर्ड आहे तसंच ऑस्ट्रेलियाचं आहे. ऑस्ट्रेलियाच्या मागच्या दौऱ्यामध्ये विराटनं सर्वोत्तम कामगिरी केली होती, अशी प्रतिक्रिया वॉनं दिली.