Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : आयपीएलचा (IPL 2024) तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सरायजर्स हैदाराबाद (SRH) संघामध्ये खेळवला गेला. या सामन्याचा अखेरच्या बॉलवर निकाल लागला. हैदराबादला विजयासाठी एका बॉलमध्ये 5 धावांची गरज होती. मात्र, कॅप्टन पॅट कमिन्सला अखेरच्या बॉलवर मोठी हिट मारता आली नाही. अखेरच्या तीन ओव्हरमध्ये हैदराबादला 60 धावांची गरज होती. तिथून हैदराबादने कोलकाताच्या विजय हिरकावण्याचा प्रयत्न केला. हेनरिक क्लासेनने 24.75 कोटीच्या मिशेल स्टार्कला धू धू धूतलं अन् हैदराबादला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुयेश शर्माच्या एका कॅचने सामना पलटला अन् कोलकाताने पहिला विजय मिळवला. आंद्रे रसेलच्या ( Andre Russell) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाताने 208 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना हैदराबादच्या हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) 29 बॉलमध्ये झंजावती 69 धावांची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताने दिलेल्या 209 धावांचं आव्हान पूर्ण करताना हैदराबादने आक्रमक सुरूवात केली. मयंक आग्रवाल अन् अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला 7 ओव्हरमध्ये 70 वर पोहोचवलं. दोघांनी 32-32 धावांची खेळी केली. मात्र लक्ष्य अजून लांब होतं. मार्करमची विकेट गेल्यावर हेनरिक क्लासेन मैदानात आला अन् आंद्रे रसलची पुनरावृत्ती केली. हेनरिक क्लासेनने विकेट्सच्या समोर 8 सिक्स खेचले अन् कोलकाताला सामन्यात आणलं. मात्र, अखेरच्या ओव्हरमध्ये गेम झाला. हैदराबादला 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना सुरेश शर्माने एक उत्तम कॅच घेतला अन् कोलकाताने सामन्यात एन्ट्री घेतली. पॅट कमिन्सला अखेरच्या बॉलवर 5 धावा करायच्या होत्या. मात्र, 20 कोटींच्या कमिन्सला ही किमया करता आली नाही.


टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय सनरायझर्स हैदराबादला भारी पडला. फिल्प सॉल्ट आणि सुनिल नारायणने केकेआरला दमदार सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, 2 ओव्हरमध्ये 23 धावा झाल्या असताना सॉल्ट आणि नारायण यांच्यातील गोंधलामुळे नारायण धावबाद झाला अन् कोलकाताला पहिला धक्का बसला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर, कॅप्टन श्रेयस अय्यर, नितिश राणा यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे कोलकाताची परिस्थिती 51 वर 4 विकेट्स अशी झाली होती. त्यावेळी रमणदीप सिंगने 17 बॉलमध्ये 35 धावांची आक्रमक खेळी केली अन् रिंकू सिंग आणि आँद्रे रसलला बेस तयार करून दिला. रिंकू 23 धावांवर बाद झाल्यावर आँद्रे रसल ईडन गार्डनच्या मैदानात वादळ निर्माण केलं. त्याने 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं अन् कोलकाताला 200 चा टप्पा पार करून दिला. आँद्रे रसलने 25 बॉलमध्ये 64 धावांची खेळी केली अन् कोलकाताने हैदराबादला 209 धावांचं आव्हान दिलं.



सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.


कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (c), नितीश राणा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.