शारजाह : आयपीएल १३ मधील २८ वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळली जात आहे. बंगलोरने रायडर्सना २० ओव्हरमध्ये १९५ रन्सचे लक्ष्य दिले. बंगलोरच्या एबी डीव्हीलीअर्सने नाबाद ७३ रन्स केले. ३३ बॉलमध्ये ५ फोर आणि ६ सिक्सर्सच्या मदतीने खेळी केली. एबीच्या विस्फोटक खेळीमुळे आरसीबी दोन विकेटच्या बदल्यात १९४ रन्स पर्यंत पोहोचली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बंगळोरचा फलंदाज एरोन फिंचला कोलकाताचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाने ४७ रन्सवर बोल्ड केलं.