मुंबई : आयपीएल स्पर्धेत दरवर्षी किमान एकतरी कॅरोबियन खेळाडू आपल्या खेळाची छाप सोडतोच. यंदाच्या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी आंद्रे रसेल करत आहे. रसेल या पर्वाच्या सुरुवातीपासूनच आपल्या बॅट-बॉलने ऑलराऊंड कामगिरी करत आहे. इतके नव्हे तर तो निर्णायक वेळी टीमला विजय मिळवून देत आहे. रसेल करत असलेल्या स्फोटक खेळीमुळे तो नक्की माणूसच आहे ना? अशा प्रकारची प्रश्न विचारले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर एका चाहत्यानी तो माणूस आहे की एलियन हे तपासण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे. एकूणच ही रसेलच्या खेळाची क्रिकेटचाहत्यांनी दिलेली पोचपावती आहे. रसेल ज्या प्रकारे प्रतिस्पर्धी टीमला आपल्या फटकेबाजीने झोडपून काढतोय. तसेच तो ज्या ताकदीने खेळतोय, यामुळे तो माणूस नाहीच, अशा प्रकारे त्याचं कौतुक होत आहे. 


रसेलची डीएनए चाचणी करा 


कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात झालेल्या मॅचमध्ये कोलकाताचा १० रनने पराभव झाला. बंगळुरुने पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलकाता समोर विजयासाठी २१४ रनचे तगडे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या कोलकाताची निराशाजनक सुरुवात राहिली. कोलकाताने आपल्या पहिल्या काही विकेट स्वस्तात गमावल्यानंतर मैदानात रसेल खेळायला आला. रसेल आला तेव्हा कोलकाताला विजयासाठी ४९ बॉलमध्ये १३५ रनची गरज होती. 


रसेल मैदानात असल्याने कोलकाता टीमने आणि समर्थकांनी आपण जिंकू अशी आशा ठेवली होती. आणि ती आशा रसेल पूर्ण करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करत होता. रसेलनने अवघ्या २५ बॉलमध्ये ६५ रन केल्या. यामध्ये त्याने ९ सिक्स आणि २ फोर लगावले. रसेलने स्फोटक खेळी केली. परंतु त्याला कोलकाताला विजय मिळवून देता आला नाही. रसेल अखेरच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर रन आऊट झाला.


 



 


दरम्यान मॅच सुरु असताना कोलकाताच्या एका उत्साही प्रेक्षकानी रसेलच्या डीएनए चाचणी करण्याची  मागणी केली. 'रसेलची डीएनए चाचणी करा, तो माणूस आहे की एलियन?' असा संदेश लिहिलेला फलक तो चाहता झळकावत होता. डीएनए चाचणी करण्याची मागणी करणाऱ्या तरुणाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या तरुणाचा फलकासोहबतचा फोटो रसेलने आपल्या इनस्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर केला आहे.