कोलकाता : टी-20 लीगमध्ये कोलकात्याकडून खेळणाऱ्या सुनिल नारायणनं नाव रेकॉर्ड बनवला आहे. भारतीय टी-20 लीगमध्ये १०० विकेट घेणारा नारायण हा तिसरा परदेशी खेळाडू बनला आहे. दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये नारायणनं ३ ओव्हरमध्ये १८ रन्स देऊन ३ विकेट घेतल्या. नारायणच्या या कामगिरीमुळे कोलकात्याचा विजय झाला. या मोसमातला कोलकात्याचा हा दुसरा विजय आहे. भारतात होणाऱ्या टी-20 लीगमध्ये १०० विकेट घेणारा नारायण हा ११वा बॉलर बनला आहे.


१०० विकेट घेणारे खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीथ मलिंगा- १५४ विकेट


अमित मिश्रा- १३४ विकेट


पियुष चावला- १३० विकेट


हरभजन सिंग- १२९ विकेट


ड्वॅन ब्राव्हो- १२३ विकेट


भुवनेश्वर कुमार- ११५ विकेट


आशिष नेहरा- १०६ विकेट


विनय कुमार- १०५ विकेट


आर. अश्विन- १०४ विकेट


सुनिल नारायण- १०२ विकेट


झहीर खान- १०२ विकेट


नारायणचा इकोनॉमी रेटही सर्वोत्तम


सुनिल नारायण याचा इकोनॉमी रेटही इतर बॉलरपेक्षा(२५० पेक्षा जास्त बॉल टाकणाऱ्या बॉलरपेक्षा) सर्वोत्तम आहे. नारायणनं ६.३ रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमीनं रन दिले आहेत. या यादीमध्ये राशीद खान(६.४), आर.अश्विन(६.५) आणि शॉन पोलॉक(६.५) हे खेळाडू आहेत.


नारायणकडे पर्पल कॅप


मोसमामध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला मिळणारी पर्पल कॅपही सध्या नारायणकडे आहे. ४ मॅचमध्ये नारायणनं ७ विकेट घेतल्या आहेत.