मुंबई : टीम इंडियाचे स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) यांना पितृशोक झाला आहे. शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. वडिलांच्या अशा अचानक जाण्याने पांड्या कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. 


टूर्नामेंट सोडून परतला क्रुणाल पांड्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीकरता बडोदाकडून खेळत असलेला क्रिकेटर क्रुणाल पांड्या खेळ सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएसनचे सीईओ शिशिर हट्टंगडी यांनी दिलेल्या माहितीनुसार,'क्रुणाल पांड्याने टीमचं बायो बबल सोडलं आहे. आता क्रुणाल पांड्या आणि त्याच्या कुटुंबियांसाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या वडिलांच्या निधनामुळे दुःखात आहेत.'



क्रुणालने उत्तराखंड विरुद्ध पहिल्या सामन्यात ७६ धावा केल्या असून तीन सामन्यात चार गडी बाद केले आहेत. 



भारताचे माजी गोलंदाज इरफान पठानने देखील ट्विट केलं आहे. 'अंकलची सर्वात पहिली भेट ही मोतीबागमध्ये झाली होती. त्यांना कायमच वाटायचं की त्यांच्या मुलांनी चांगल क्रिकेट खेळावं. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. '



हार्दिक आणि क्रुणाल या दोघांनी कायमच आपल्या यशाचं श्रेय हे वडिलांना दिलं आहे. दोघांच्या यशस्वी क्रिकेट खेळण्यामागे त्यांच्या वडिलांची मेहनत आहे.