मुंबई : वानखेडे स्टेडियमवर गुजरात विरुद्ध लखनऊ सामना खेळवण्यात आला. गुजरात टीमने हा सामना 5 विकेट्सने जिंकला आहे. राहुल तेवतियाने 40 तर हार्दिक पांड्याने 33 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 30 धावा केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ संघात दीपक हुड्डा आणि आयुषने धमाकेदार खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाला बळ मिळालं. मात्र एका चुकीमुळे लखनऊ टीमला हा सामना गमवावा लागला. 


या सामन्यात दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. हार्दिक पांड्या क्रीझवर बॅटिंग करत असताना कृणाल पांड्याने त्याला आऊट केलं. विरोधी टीममधील फलंदाज आपला भाऊ असल्याने त्याने हा आनंद साजरा केला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बदलले होते. 


हार्दिक पांड्या आऊट झाल्याने कृणाल उदास झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  हार्दिक पांड्या 28 बॉलमध्ये 33 धावा करून आऊट झाला. षटकार ठोकण्याच्या नादात तो कॅच आऊट झाला. 


कृणाल पांड्याने तो आऊट झाल्याचा आनंद साजरा केला नाही. तर तो निराश झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन सख्खे भाऊ मुंबई संघातून एकत्र खेळायचे मात्र त्यांना मुंबईने यंदा घेतलं नाही. हार्दिकला गुजरातने घेतलं. तर कृणालला लखनऊने घेतलं. त्यामुळे दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात खेळताना या सामन्यात दिसले.