नवी दिल्ली : भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर क्रृणाल पांड्या याने बुधवारी आपली मैत्रिण, प्रेयसी पंखुरी शर्मा सोबत विवाहबद्ध झाला. हा शाही सोहळा मुंबईतील जेडब्ल्यू हॉटेलमध्ये रंगला. या सोहळ्याला सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांनी उपस्थिती लावली.


लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर या शाही लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. लग्नासाठी क्रृणाल आपला भाऊ हार्दीक सोबत बुलेटवरून आला.



पंखुरीबद्दल बोलला क्रृणाल...


तसंच एका मुलाखतीत क्रुणाल म्हणाला की, पंखुरी माझ्या मित्राची मैत्रीण असून एका कार्यक्रमात दोन वर्षांपूर्वी आमची ओळख झाली. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि मग आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तिच्यातील साधेपणा आणि साहाय्य करण्याची वृत्ती मला फार आवडते.’
पुढे तो म्हणाला की, मला आनंद आहे की, मला समजून घेणाऱ्या मैत्रिणीशी माझे लग्न होत आहे.


क्रृणालबद्दल काही...


क्रृणाल आयपीएल २०१६ आणि २०१७ च्या सीजनमधील मुंबई इंडियन्सचा सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. धमाकेदार फलंदाजीसोबतच त्याची स्पिन बॉलिंगही प्रसिद्ध आहे.



कोण आहे पंखुरी ?


पंखुरी ही मॉडेल आणि प्रोफेशनल स्टायलिस्ट आहे.
सध्या ती फिल्म मार्केटिंग करत असल्याचे समजते. 
खरंतर तिला क्रिकेट हा खेळ कळत नाही आणि आवडतही नाही. मात्र क्रुणालमुळे तिला क्रिकेटचे महत्त्व कळले आणि तिने क्रिकेट पाहण्यास हळूहळू सुरूवात केली. तसंच क्रुणालचे सामने ती आर्वजून पाहते.