नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकन टीमला मंगळवारी आपल्याच घरात पराभूत करत टीम इंडियाने वन-डे सीरीज आपल्या नावावर केली. हा विजय म्हणजे टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातील सर्वात मोठ्या वन-डे सीरिजपैकी एक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमने ४-१ने सीरिज आपल्या नावावर केली आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मोठी कामगिरी केली. 


कुलदीप-चहलने आफ्रिकन बॅट्समनला गुंडाळलं


दक्षिण आफ्रिकन टीमच्या पराभवामागे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची भूमिका महत्वाची ठरली. कुलदीप आणि चहल यांच्या जोडीने आफ्रिकन बॅट्समनला आपल्या बॉलिंगने चांगलचं गारद केलं.


कुलदीप आणि चहलचा करिश्मा 


कुलदीप यादवने आतापर्यंत ११.५६च्या सरासरीने १६ विकेट्स घेतले आहेत. तर, युजवेंद्र चहलने १६ च्या सरासरीने १४ विकेट्स घेतले. कुलदीप आणि चहल यांची जोडी केवळ चौथ्या वन-डे मॅचमध्ये कमी पडली आणि त्याच मॅचमध्ये आफ्रिकन टीमने विजय मिळवला.


सर्वाधिक विकेट्स घेतले


कुलदीप आणि चहल यांच्या जोडीने सीरिजमध्ये एकूण ३० विकेट्स आतापर्यंत घेतले आहेत. एखाद्या सीरिजमध्ये भारतीय स्पिनर्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी पहिली जोडी ठरली आहे. यापूर्वी २००५-०६ मध्ये भारतीय स्पिनर्सने इंग्लंड विरोधात २७ विकेट्स घेतले होते.


मुरलीधरनला टाकलं मागे


टीम इंडियाचा चायना मॅन कुलदीप यादव याने दक्षिण आफ्रिकेत दाखवलेल्या चांगल्या कामगिरी दरम्यान त्याने मुरलीधरनलाही मागे टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेत वन-डे सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मुरलीधरनच्या नावावर होता. त्याने १९९८ मध्ये आफ्रिकन टीमचे १४ विकेट्स घेतले होते. ही एक ट्राय सीरिज होती आणि त्यात पाकिस्तानची टीमही होती.


टीम इंडियाच्या कुलदीप यादवने आतापर्यंत खेळलेल्या ५ मॅचेसमध्ये १६ विकेट्स घेतले आहेत आणि या दरम्यानच त्याने मुरलीधरनचा रेकॉर्ड तोडला.


कुलदीप-चहलने तोडला वेस्टइंडिज ऑलराऊंडरचा रेकॉर्ड


कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यांनी वेस्टइंडिजचा ऑलराऊंडर किथ अथर्टनचा रेकॉर्ड तोडला आहे. किथ अथर्टनने १९९८-९९ मध्ये सात वन-डे सीरिजमध्ये १२ विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.