नॉटिंगहॅम : पहिल्या वनडेमध्ये कुलदीप यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या टीमनं लोटांगण घातलं. कुलदीप यादवनं १० ओव्हरमध्ये २५ रन देऊन ६ विकेट घेतल्या. कुलदीप यादवच्या स्पिनमुळे इंग्लंड ४९.५ ओव्हरमध्ये २६८ रनवर ऑल आऊट झाली. या कामगिरीबरोबरच कुलदीप यादवनं अनेक रेकॉर्डनाही गवसणी घातली आहे. वनडे क्रिकेटमध्ये डावखुऱ्या स्पिनरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडमध्ये कोणत्याही स्पिनरची ही सर्वोत्तम बॉलिंग आहे. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही स्पिनरची सर्वात चांगली कामगिरी आहे. तर भारताकडून ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे.


याआधी २०१४ साली मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये स्टुअर्ट बिनीनं ४ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. कुंबळेनं १९९३ साली वेस्टइंडिजविरुद्ध कोलकात्यामध्ये १२ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. २००३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये आशिष नेहरानं २३ रन देऊन इंग्लंडच्या ६ बॅट्समनना माघारी पाठवलं. आता कुलदीपनं २५ रन देऊन ६ विकेट घेतल्या.