मुंबई : कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल नुकतेच 'व्हॉट द डक'च्या एका भागात सोबत दिसले. महेंद्रसिंग धोनीचं विकेटमागेही कसं योगदान असतं याचाही कुलदीपनं एक छोटा किस्सा या कार्यक्रमात सांगितला. आपल्या 'कूल' अंदाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या धोनीनं एकदा मैदानावर कुलदीपला चांगलंच झापलं होतं. परंतु, धोनीच्या रागावण्याचाही कुलदीपला फायदाच झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलनं इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या टी २० मॅचचा उल्लेख केला. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये भारतानं २६० रन्स बनवले होते. याच्या उत्तरादाखल श्रीलंकेचे बॅटसमन बॅटींगसाठी मैदानावर उतरले होते... आणि चौकार - षटकार ठोकत कुलदीप-चहल दोघांचीही धुलाई करत होते. 


विकेटकिपर धोनी दोघांनाही सतत 'थोडा और दूर...' म्हणत होता... कुलदीपच्या बॉलवर जेव्हा सलग चौकार - षटकार लागले तेव्हा त्यानं धोनीकडे पाहिलं... धोनी कुलदीपकडे आला आणि म्हणाला, कव्हर्स हटवून कव्हर्स डीप करून घे आणि पॉईंट वर ठेव... यावर कुलदीपनं 'नाही माही हेच ठिक आहे' असं म्हटलं तेव्हा कॅप्टन कूलचाही थोडा पारा चढलाच... '३०० ODI खेळणारा मी वेडा आहे का?' असं म्हणत त्यानं कुलदीपला फैलावर घेतलं. 


त्यानंतर कुलदीपनं या मॅचमध्ये तीन विकेट घेतले तर चहलनं चार... ही आणि अशा आणखी काही आठवणी तुम्ही कुलदीप आणि चहलच्या तोंडूनच ऐका... या व्हिडिओतून...