दे दणादण! 17 व्या वर्षात झंझावाती बॅटिंग, 2 शतकं झळकावत मोडला हा विक्रम
17 व्या वर्षी झंझावाती बॅटिंगनं पाडला धावांचा पाऊस, पाहा कोण आहे तो युवा खेळाडू
मुंबई : वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या झंझावाती बॅटिंगने धावांचा पाऊस पाडला आहे. यासोबत 2 शतकं ठोकून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा विक्रम मोडला आहे. रणजी ट्रॉफीच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये झारखंडने नागालँड विरुद्ध इतिहास रचला आहे. पहिल्याच डावात 880 धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीमधील सर्वात जास्त धावांचा हा विक्रम झारखंडने रचला आहे.
या सामन्यात झारखंडकडून खेळणाऱ्या 6 फलंदाजांनी 50 हून अधिक दोन फलंदाजांनी शतक ठोकलं. तर एकाने द्विशतक केलं आहे. झारखंडचा विकेटकीपर कुमार कुशाग्रने 266 धावांची खेळी केली आहे. शाहबाज नदीमने 177 धावा केल्या. विराट सिंहने 107 धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वोधिक मोठा स्कोअर करणारी चौथी टीम ठरली आहे. 1993-94 साली हैदराबाद, त्यानंतर तमिळनाडू आणि मध्य प्रदेश संघाने 900 हून अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर झारखंड चौथ्या क्रमांकावरची टीम ठरली आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि ईशान किशनचा रेकॉर्डही तोडला आहे. या खेळाडूचं नाव कुमार कुशाग्र आहे. वडील शशिकांत यांनी आपल्या मुलाचं कौतुक करताना सांगितलं की आपल्या मुलानं घरात ट्रॉफीची लायब्ररी उघडली आहे. मुलाच्या कामगिरीचं कौतुक ऐकून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.