ICC अध्यक्षपदासाठी श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूने केले गांगुलीचं समर्थन
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचं नाव चर्चेत
मुंबई : श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल (आयसीसी) च्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली यांचे समर्थन केले आहे. संगकाराने म्हटले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) 'कठोर क्रिकेट मनाचे' आहेत आणि प्रशासक म्हणून अनुभव त्याला या भूमिकेसाठी एक 'अतिशय योग्य' स्पर्धक बनवितो. संगकाराने म्हटलं की, या माजी भारतीय कर्णधाराची आंतरराष्ट्रीय मानसिकता आहे. जी महत्त्वाची पदे सांभाळताना पक्षपातीपणापासून मुक्त राहण्यासाठी आवश्यक आहे.
मेरिलबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) विद्यमान अध्यक्ष संगकाराने म्हटलं की, "मला वाटते सौरव गांगुली बदल घडवून आणू शकेल. मी दादा (गांगुली) चा एक मोठा चाहता आहे, तो केवळ क्रिकेटपटू म्हणूनच नाही तर मला वाटते की त्याच्याकडे कुशाग्र क्रिकेट बुद्धी आहे. तो क्रिकेटच्या सर्वोत्तम हिताबद्दल सखोल विचार करतो आणि जेव्हा आपण आयसीसीमध्ये असतो तेव्हा ते बदलले जाऊ नये कारण आपण बीसीसीआय अध्यक्ष किंवा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड किंवा श्रीलंका क्रिकेट किंवा इतर कोणतेही बोर्डचे अध्यक्ष नसतो.'
संगकाराने म्हटलं की,'तुमची मानसिकता आंतरराष्ट्रीय असली पाहिजे आणि तुम्ही कुठून आहात जसे की, मी भारतीय, श्रीलंकन, ऑस्ट्रेलियन किंवा इंग्लंडचा आहे. असं नसावं. यामध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ नये. त्याने समजून घेतले पाहिजे की मी एक क्रिकेटर आहे आणि मी सर्व क्रिकेट खेळणार्या देशांसाठी सर्वोत्तम काम करीत आहे.
संगकारा म्हणाला की, 'बीसीसीआय अध्यक्ष होण्यापूर्वीच मी त्याचे काम पाहिले आहे. जगभरातील खेळाडूंशी त्याचे संबंध. एमसीसी क्रिकेट समितीती त्याचा कार्यकाळ पाहिला आहे.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी या महिन्याच्या सुरूवातीला आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हाँगकाँगचा इम्रान ख्वाजा यांना निवडणुकीपर्यंत अंतरिम अध्यक्ष केले गेले आहे.
संगकारा हा एकमेव माजी आंतरराष्ट्रीय कर्णधार नाही ज्याने गांगुलीचे समर्थन केले. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संचालक ग्रॅम स्मिथने देखील या पदासाठी गांगुलीचे समर्थन केले आहे. गांगुलीने म्हटले आहे की, आयसीसी पदाबाबत अजून कोणतीही घाई नाही.