Fifa World Cup Argentina Wins : फिफा वर्ल्ड कप 2022 वर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर फुटबॉल विश्वात लियोनेल मेस्सीचे एकच चर्चा रंगलीय. सोशल मीडियावर मेस्सीचे वर्ल्ड कप उंचावतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. असं सर्व असताना प्रतिस्पर्धी फ्रान्सचा खेळाडू किलियन एमबाप्पेची (Kylian Mbappe) हि चर्चा आहे. त्याने एकट्याने झुंज देऊन अर्जेंटिनाच्या नाकात दम केला होता. या त्याच्या झंझावती खेळीने त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या त्याच्या रेकॉर्डची फुटबॉल विश्वात चर्चा आहे.  


हे ही वाचा :  लियोनेल मेस्सी फुटबॉलचा 'सचिन तेंडूलकर' ठरला!, दोघांचे 'हे' आकडे जुळतात


एमबाप्पेला अश्रू अनावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी थेट मैदान गाठलं आणि एमबाप्पेचं सांत्वन केलं. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एमबाप्पेला जवळ घेतलं आणि एकहाती झुंज दिल्याने त्याच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. या संदर्भातले फोटो देखील व्हायरल होत आहेत. 


हे ही वाचा : Emiliano Martinez ची 'गोल्डन ग्लोव्ह'चा पुरस्कार स्विकारताना 'ती' कृती, VIDEO होतोय व्हायरल 


'हे' रेकॉर्ड रचले


  • किलियन एमबाप्पेने वयाच्या 19 व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला होता.  

  • एमबाप्पे (Kylian Mbappe) वयाच्या 23 व्या वर्षी वर्ल्ड कप फायनलिस्ट ठरलाय.

  • एमबाप्पे (Kylian Mbappe) फिफा वर्ल्ड कप 2022 चा गोल्डन बुट विनर ठरलाय.

  • वर्ल्ड कप फायनलमध्ये एमबाप्पेने हॅट्ट्रीक गोल करण्याचा विक्रम केला.

  • एमबाप्पे (Kylian Mbappe) हा पहिला असा खेळाडू ठरलाय ज्याने फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये 7 पेक्षा अधिक गोल केले आहेत. 2002 मध्ये अशी कामगिरी रोनाल्डोने केली होती. 

  • एमबाप्पे (Kylian Mbappe) वर्ल्ड कपमध्ये 7+ गोल करणारा खेळाडू ठरलाय. तसेच 23 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने एकाच वर्ल्ड कपमध्ये मध्ये सर्वाधिक गोल केल्याचा विक्रम देखील त्याच्याच नावे आहे.  


दरम्यान फिफा वर्ल्ड कपच्या थरारक फायनल सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये (Penalty Shootout) फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. हा विजय मिळवून अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेटिना संघाने हा वर्ल्ड कप जिंकून मेस्सीला चांगला निरोप दिला होता.



सोशल मीडियावर एकिकडे मेस्सीच्या विजयाची चर्चा असताना, दुसरीकडे फॅन्स एमबाप्पेचेही (Kylian Mbappe) कौतूक करत आहे. एमबाप्पेने दिलेल्या एकाकी खेळीची फॅन्स प्रशंसा करतायत.