Fifa World Cup : लियोनेल मेस्सी फुटबॉलचा 'सचिन तेंडूलकर' ठरला!, दोघांचे 'हे' आकडे जुळतात

Fifa World Cup Argentina Win : जगातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीचा (lionel messi) जर्सी क्रमांक 10 आहे. तसेच क्रिकेटमधील महान खेळाडू असलेल्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) जर्सी क्रमांक देखील तोच होता.

Updated: Dec 19, 2022, 05:16 PM IST
Fifa World Cup : लियोनेल मेस्सी फुटबॉलचा 'सचिन तेंडूलकर' ठरला!, दोघांचे 'हे' आकडे जुळतात title=

Fifa World Cup Argentina Win : फिफा वर्ल्डकप 2022 वर अर्जेंटिनाने नाव कोरले आहे. फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली... आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar)  आणि लियोनेल मेस्सीची (lionel messi) तुलना होऊ लागली आहे. यामागचे कारण म्हणजे दोघांची आपआपल्या खेळातील कारकिर्द एकसारखीच राहिली आहे. सचिन 10 नंबर्सची जर्सी घालून मैदानात उतरायचा तसेच मेस्सी देखील त्याच नंबरची जर्सी घालायचा. दोघांनी त्याच्या शेवटच्या सामन्यात आपआपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यामुळे या दोन महान खेळाडूंची अनेक समीकरणे जुळतायत. 

हे ही वाचा : Emiliano Martinez ची 'गोल्डन ग्लोव्ह'चा पुरस्कार स्विकारताना 'ती' कृती, VIDEO होतोय व्हायरल 

 

जर्सी क्रमांक 10 

जगातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीचा (lionel messi) जर्सी क्रमांक 10 आहे. तसेच क्रिकेटमधील महान खेळाडू असलेल्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) जर्सी क्रमांक देखील तोच होता. दोघांचा जर्सी क्रमांक एकच होता, आणि दोघेही त्यांच्या त्यांच्या खेळातले महान खेळाडू आहेत.

 

हे ही वाचा : Kylian Mbappe चा भीमपराक्रम! फायनल सामन्यात रचले 'इतके' रेकॉर्ड 

 

कारकिर्दीतला शेटवचा वर्ल्ड कप जिंकला 

अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनाने याआधी 1978 आणि 1986 ला वर्ल्ड कप जिंकला होता, त्यानंतर आता 2022 ला तिसऱ्यांदा जिंकला. या विजयासह लिओनेल मेस्सीचे (lionel messi) वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.2006 मध्ये  पदार्पण करणाऱ्या मेस्सीने पाचव्या वर्ल्ड कपमध्ये जाऊन विश्वचषक जिंकला. विशेष म्हणजे हा मेस्सीचा शेवटचा वर्ल्ड कप होता आणि तो त्याच्या संघाने जिंकला आहे. सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) बाबतीतही तेच झाले होते. भारताने 1983 साली पहिला वर्ल्ड कप जिंकला होता, त्यानंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकला होता. सचिनसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप होता आणि भारताने तो जिंकला होता. 

फायनल सामन्यात पराभूत 

सचिनचा (Sachin Tendulkar) सहावा एकदिवसीय विश्वचषक होता. मात्र, मेस्सीप्रमाणे तोही दोनदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. एकदा तो पराभूत झाला आणि एकदा त्याचा संघ चॅम्पियन झाला.2003 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. 2014 च्या फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये मेस्सीचा संघ अर्जेंटिना जर्मनीकडून पराभूत झाला होता. मेस्सीने (lionel messi) कारकिर्दीत केवळ दोनच विश्वचषक फायनल खेळला. त्यापैकी एक हरला आणि एक जिंकला

वर्ल्ड कपमध्ये दुसरा क्रमांक 

या वर्ल्ड कपमध्ये मेस्सीने (lionel messi) एकूण 7 गोल केले असून स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.तर फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने त्याच्यापेक्षा जास्त गोल केले होते. एम्बाप्पेने आठ गोल केले. तर 2011च्या वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरही सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होता. सचिनने 9 सामन्यांत त्याने 482 धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने सचिनपेक्षा (Sachin Tendulkar) जास्त धावा केल्या होत्या. दिलशानने 9 सामन्यांमध्ये 500 धावा केल्या होत्या. 

कारकिर्दीचा गोड शेवट

मेस्सीसाठी  (lionel messi) हा शेवटचा वर्ल्ड कप होता. हा वर्ल्ड कप जिंकून त्याने त्याच्या कारकिर्दीचा शेवट गोड केला. सचिनच्या बाबतीतही तसेच झाले होते. सचिनने ही कारकिर्दीतला शेवटचा वर्ल्ड कप जिंकला होता.

दरम्यान सचिनच्या (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतर त्याला क्रिकेटचा देव म्हटले गेले. आता मेस्सीला निवृत्तीनंतर त्याला फुटबॉलचा देव म्हणतात का, हे पाहावे लागणार आहे.