चेन्नई :  दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ने IPL 2021 च्या आपल्या दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरूद्ध एका नवीन खेळाडूला संधी दिली आहे. ललित यादव (Lalit yadav) असे या खेळाडूचे नाव आहे. तो घरगुती क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. ललित यादव (Lalit yadav) हा उजवा हाताने खेळणारा बॅट्समॅन आहे, तसेच तो फिरकी बॅालर देखील आहे. त्याने दिल्लीसाठी आतापर्यंत 12 सामन्यांत 570 रन्स केले आहे आणि 9 विकेट्स देखील घेतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललित यादव (Lalit yadav) ने आतापर्यंत 35 टी -20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 560 धावा केल्या आहेत आणि 27 बळी घेतले आहेत. शेवटच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये ललित यादव वेगवान रन्स करण्यासाठी ओळखला जातो.


24 वर्षीय ललित यादवने बॅट्समॅन म्हणून आपल्या करिअरची सुरवात केली. अंडर -14 क्रिकेटमध्ये त्याने 40 ओव्हरच्या सामन्यात 2 शतक ठोकली. तसेच त्याच्या नावावर 2 वेळा सलग सहा छक्के मारण्याचा रेकॅार्ड आहे. क्लब क्रिकेटमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. तसेच त्याने एका मॅचमध्ये 46 बॅालमध्ये 13 छक्के आणि 9 चौक्यांच्या मदतीने 130 धावा फटकावल्या आहेत.


आयपीएल 2020 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ललित यादवला (Lalit yadav) 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केली आहे.


विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्म


अलीकडेच ललित यादवने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी अप्रतिम बॅटिंग केली. यादरम्यान ललितने सात सामन्यांमध्ये 59.33 च्या सरासरीने 178 रन्स केले. या त्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. तसेच त्याने दिल्लीकडून 11 बळीही घेतले.


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ललित यादव पाच सामने खेळला आणि 152 धावा केल्या. यावेळी तो पाचपैकी चार डावांमध्ये नाबाद होता.