मुंबई : डिसेंबर महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India va South Africa) होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट आणि 3 वनडे सीरीज खेळणार आहे. या दौऱ्यात 3 भारतीय खेळाडूंची खरी कसोटी असणार आहे. कारण त्यांनी चांगली कामगिरी नाही केली तर त्यांना टीम इंडियातून वगळलं जावू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत हरवणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही. अशा स्थितीत हे 'अशक्य' शक्य करून दाखवण्याचे मोठे आव्हान 'विराट सेने'समोर आहे, त्यात अनेक ज्येष्ठ खेळाडूंचा अनुभव कामी येऊ शकतो.


या 3 ज्येष्ठ खेळाडूंना शेवटची संधी!


टीम इंडियामध्ये असे अनेक सीनियर खेळाडू आहेत ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल, अन्यथा त्यांची कारकीर्द कायमची संपुष्टात येऊ शकते.


इशांत शर्मा


इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सर्वात जास्त दडपण इशांत शर्मावर असेल, जो विकेट घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. निवडकर्त्यांनी या 33 वर्षीय खेळाडूला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत इशांतने एकही विकेट घेतली नाही, मुंबईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत तो दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांनी कसोटी संघात आपल्या वरिष्ठ इशांतपेक्षा चांगली कामगिरी केल्याने दिल्लीच्या खेळाडूची कारकीर्द धोक्यात आली आहे.
 
रहाणे आणि पुजारा


बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, 'रहाणेला उपकर्णधारपदावरून हटवणे हा त्याच्यासाठी इशारा आहे. ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांनी अधिक योगदान द्यावे. हीच गोष्ट पुजारालाही लागू पडते. तो बर्‍याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असून आता तो मोठ्या सामन्यांमध्ये महत्त्वाच्या खेळी खेळेल अशी आशा संघाला आहे. जर दोघांनी चांगली धावसंख्या केली तर त्याचा मालिकेवर मोठा परिणाम होईल, त्यामुळे ते आपली कसोटी कारकीर्द पुढे नेऊ शकतील, पण इशांतच्या बाबतीत तसे नाही.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय कसोटी संघ


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद, शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.


स्टँडबाय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागवासवाला.