मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीम या महिन्यात दक्षिण आफ्रिकेशी मालिका खेळणार आहे. ही मालिका अनेक दिग्गज खेळाडूंसाठी टीम इंडियाच्या जर्सीतील शेवटची मालिकाही ठरू शकते. विशेषत: या मालिकेवर विराटच्या कर्णधारपदाची भिस्त आहे. एका चुकीमुळे विराटचे कर्णधारपद हिरावून घेतले जाईल, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे.


विराटला एक चूक पडणार महागात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील कारण ही एकदिवसीय कर्णधार म्हणून त्याच्यासाठी शेवटची मालिका देखील ठरू शकते. 19 जानेवारीपासून मालिका सुरू होणार असल्याने वनडे संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे.


वनडे कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या भवितव्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. टीम इंडियाच्या हितासाठी या मालिकेचा निर्णय झाला नाही, तर विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात येईल, असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं. विराटने यापूर्वीच टी-20 संघाचे कर्णधारपद सोडलं आहे.


कोण बनणार वनडे कर्णधार


भारताला दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. रोहित शर्मा आधीच T20 संघाचा कर्णधार आहे आणि 2023 मध्ये होणार्‍या 50 ओव्हर वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर, BCCI मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये नवीन कर्णधार नियुक्त करण्याची चर्चा करत आहे.


बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, 'विराटला सध्या वनडे कर्णधारपद राखणं कठीण जात आहे. यावर्षी फार कमी सामने आहेत त्यामुळे वनडेला फारसे महत्त्व नाही. अशा स्थितीत याबाबत निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो.