हैदराबाद : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला त्यांचं पद गमवावं लागलं आहे. यानंतर स्टीव्ह स्मिथनं राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेकडे राजस्थानचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.


डेव्हिड वॉर्नरचं काय होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मिथनंतर आता सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार असलेल्या डेव्हिड वॉर्नरचं काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रकरणावर सनरायजर्स हैदराबादचा मेंटर व्ही.व्ही.एस.लक्ष्मणनं मौन सोडलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं डेव्हिड वॉर्नरबद्दल निर्णय घेतल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं लक्ष्मण म्हणाला आहे.


केप टाऊनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे. सध्यातरी याप्रकरणावर एवढ्या लवकर बोलणं योग्य नाही, असं लक्ष्मण म्हणालाय. वॉर्नरवर कारवाई झाली तर कोणाला कर्णधार करणार असा प्रश्नही लक्ष्मणला विचारण्यात आला. याबाबत आम्ही कोणताही विचार केलेला नाही, अशी प्रतिक्रिया लक्ष्मणनं दिली. वॉर्नरला हैदराबादचं कर्णधारपद सोडायला लागलं तर शिखर धवनला कर्णधार बनवलं जाऊ शकतं