मुंबई : भारताचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने वर्ल्डकप २०१९ मध्ये २ संघ प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट टीम आणि इंग्लंड टीम यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये येऊ शकतात. बुधवारी सैयद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटदरम्यान लक्ष्मणने हे वक्तव्य केलं आहे. लक्ष्मणने म्हटलं की, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीज जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने यंदाच्या वर्ल्डकपसाठी दावेदारी ठोकली आहे. भारताने वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ ने आणि न्यूझीलंडला ४-१ ने पराभूत करत इतिहास रचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएएनएसनुसार, लक्ष्मणने म्हटलं की, 'सगळे योग्य वेळी फॉर्ममध्ये येत आहेत. जे खूप महत्त्वाचं आहे. वर्ल्डकप एक अनेक दिवसांनी येणारी सीरीज आहे. जर भारताला यंदाचा वर्ल्डकप जिंकायचा आहे तर प्रत्येक खेळाडूला फीट आणि मानसिकरित्या सर्वश्रेष्ठ असलं आहे. माझासाठी भारत आणि इंग्लंड यंदाच्या वर्ल्डकपसाठी प्रबळ दावेदार आहेत.'


लक्ष्मणने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्य़े मिळवलेल्या विजयावर भारतीय टीमचं कौतूक केलं. त्याने म्हटलं की, 'मला वाटतं हा शानदार विजय आहे. ज्याप्रकारे ते खेळले त्यासाठी संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. या विजयात संपूर्ण टीमचं योगदान होतं. बॉलर आणि बॅट्समन दोघांच्या योगदानामुळे हा विजय झाला.'