दुबई : भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळण्याबरोबरच आणखी एक चांगली बातमी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघाची एकदिवसीय क्रमवारीत एका अंकाने सुधारणा झाली आहे.
भारताने ११८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. फक्त एका अंकाने भारत दक्षिण आफ्रिकेच्या मागे आहे. तर ११७ गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानकडून पराभूत झालेला इंग्लंड संघ ११३ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
जर अंतिम फेरीत भारताने विजय मिळवला तर पहिल्या स्थानी पोहचेल, परंतु अंतिम फेरीत भारत पराभूत झाला तर भारतीय संघाला तिसऱ्या स्थानावर समाधानी राहावं लागेल.