Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे खळबळ उडाली आहे. टी 20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकणं भारताला कठीण असल्याचं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे. इतकंच काय तर भारतीय संघ टॉप-4 मध्ये जागा मिळवेल की नाही? याबाबतही शंका उपस्थित केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"भारत विश्वचषक जिंकेल असं वाटत नाही. इतकंच काय तर सेमीफायनलपर्यंत पोहोचणं देखील कठीण वाटत आहे. माझ्या मते सुपर-4 मध्ये पोहोचण्याचे भारताची शक्यता फक्त 30 टक्के आहे.", असं माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितलं. "अष्टपैलू खेळाडूंच्या जोरावर सामना जिंकू शकता. हार्दिक पांड्यावर बरंच काही अवलंबून आहे. रोहित शर्माला सहावा गोलंदाज म्हणून चांगला पर्याय असेल. त्याची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही चांगलं आहे.", असं कपिल देव यांनी पुढे सांगितलं.


Video: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात


भारतीय संघाने 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकमेव विजेतेपद पटकावले आहे. तेव्हापासून टीम इंडिया या जेतेपदापासून वंचित आहे. T20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आहे.


भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर. अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, दीपक हुड्डा