Gautam Gambhir Shahid Afridi: पाकिस्तान (Pakistan) आणि भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जेव्हा कधी मैदानात एकमेकांशी भिडतो तेव्हा संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असतो. त्यातही दोन्ही संघातील काही खेळाडू एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने ते समोर आल्याने वाद निर्माण होणार याची शंका असते. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांचा मैदानातील वाद आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. दरम्यान Legends League Cricket T20 च्या निमित्ताने दोन्ही खेळाडू आमने-सामने आले होते. यादरम्यान दोन्ही खेळाडूंमधील एक क्षण सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Legends League Cricket T20 मध्ये India Maharajas आणि Asia Lions हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. यादरम्यान अनपेक्षितपणे दोन्ही खेळाडू एकमेकांशी अगदी मित्राप्रमाणे वागत असल्याने चाहत्यांसाठी थोडा आश्चर्याचा धक्काच होता. विशेष म्हणजे, एका ओव्हरमध्ये गौतम गंभीरच्या हेल्मेटला चेंडू लागला असता शाहिद आफ्रिदीने जाऊन त्याची चौकशी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


नेमकं काय झालं?


12 व्या ओव्हरमध्ये भारतीय संघ फलंदाजी करत असताना गौतम गंभीर स्ट्राइकवर होता. यावेळी अब्दुल रझाकच्या गोलंदाजीवर गंभीरने फाइन लेगला मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागल्यानंतर त्याच्या हेल्मेटला लागला. यावेळी गौतम गंभीरला काही दुखापत झाली नाही. पण शाहिद आफ्रिदीने गौतम गंभीरकडून जाऊन त्याची चौकशी केली आणि सामना सुरु केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहिद आफ्रिदीचं हे कृत्य  चाहत्यांचं मन जिंकत आहे. 



दरम्यान हा सामना Asia Lions ने India Maharajas चा पराभव करत 9 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना Asia Lions ने 165 धावा केल्या होत्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली नव्हती. रॉबिन उथप्पा शून्यावर बाद झाला. तर गौतम गंभीरने 39 चेंडूत 54 धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज चांगल्या धावा करु न शकल्याने9 धावांनी त्यांनी हा सामना गमावला.