FIFA World Cup Final : फिफा वर्ल्ड कप 2022 वर अर्जेंटीना संघाने नाव कोरले आहे. अर्जेंटीना संघाने पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने फ्रान्स पराभव करत विजय मिळवला. या विजयासह अर्जेंटीना संघाने मेस्सीला चांगला निरोप दिला आहे. तसेच या रोमांचक सामन्याच्या विजयानंतर अर्जेंटीना संघाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन फुटबॉल प्रेमींच्याही डोळ्यात पाणी येत आहे.
 
फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. वर्ल्डकपचा हा सामना अतिशय रंजक झाला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जेंटींनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने त्याच्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये त्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अर्जेंटीनाच्या फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. त्याने अंतिम फेरीत शानदार खेळ करत पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला. लुसेल स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. 



फिफा वर्ल्डकप फायनलचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर एक्स्ट्रा टाईम देण्यात आला होता. या एक्स्ट्रा टाईममध्ये मेस्सी आणि एम्बाप्पे यांनी 1-1 गोल केला. अशा प्रकारे सामना पुन्हा 3-3 असा बरोबरीत सुटला. यानंतर, अंतिम सामन्याचा रिझल्ट पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. यामध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. यावेळी अर्जेंटीनाचा गोलकीपर एमी मार्टिनेझ विजयाचा शिल्पकार ठरलाय.