Lionel Messi Wife : फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (FIFA World Cup Final 2022) अर्जेंटीनाने (Argentina vs France) फ्रान्सवर मात केली आणि विश्व चषकावर आपलं नाव कोरलं. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयाबरोबरच अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. अर्जेंटिनाच्या विजयानंतर जगभरात केवळ लियोनेल मेस्सीचीच चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे मेस्सीची पत्नी
मेस्सी हा फूटबॉल चाहत्यांच्या गळयात ताईत बनला आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. अप्रतिम खेळ आणि कठोर मेहनतीबरोबरच मेस्सीच्या यशामागे त्याच्या पत्नीचाही तितकचा मोठा वाटा आहे. मेस्सीच्या पत्नीचं नाव एंटोनेला रोकुजो (Antonela Roccuzzo) असं आहे. एंटोनेला नेहमीच मेस्सीची सपोर्ट सिस्टिन राहिली आहे. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात मेस्सी आणि अर्जेंटिनाला पाठिंबा देण्यासाठी एंटोनेला कतारमध्ये (Quatar) आपल्या मुलांसह उपस्थित होती. 



एंटोनेला रोकुजोची स्वतंत्र ओळख
लियोनेल मेस्सीची पत्नी याशिवाय एंटोनेला रोकुजोची स्वंतत्र्य ओळख आहे. ती एक प्रसिद्ध मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. एंटोनेला सोशल मीडियावरही (Social Media) प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे तब्बल 22 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मेस्सी आणि एंटोनेलाचं लग्नाला वेडिंग ऑफ सेंच्युरी असं म्हटलं जातं. रिपोर्टनुसार एंटोनेलाची वर्षभराची कमाई जवळपास 20 मिलियन डॉलर म्हणजे 165 कोटी रुपये इतकी आहे. एंटोनेला काही फिटनेस ब्रँडसाठीही काम करते.



मेसी आणि एंटोनेलाचं 'बसपन का प्यार'
मेसी आणि एंटोनेला 2008 पासून अर्जेंटिनाच्या रोसारियो भागात एकत्र राहतात. खरतर दोघं अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. मेसी पाच वर्षांचा असल्यापासून त्याची एंटोनेलाबरोबर मैत्री आहे. एंटोनेला मेस्सीच्या लहानपणीचा बेस्ट फ्रेंड लुकास स्काग्लियाची बहिण आहे. मेसी आणि एंटोनेला यांनी जवळपास एक वर्ष आपलं नातं लोकांपासून लपवलं. त्यानंतर 2009 मध्ये एका मुलाखतीत मेसीने पहिल्यांदा एंटोनेलाबरोबरच्या नात्याविषयी खुलासा केला. मेसी आणि एंटोनेला यांना तीन मुलं आहेत. थियागो (2012), माटेओ (2015) आणि सीरो (2018) अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. 



मेस्सी परफेक्ट फॅमिलि मॅन
लियोनेल मेस्सी हा खेळाबरोबरच आपल्या कुटुंबालाही तितकाच वेळ देतो. वेळ मिळेल तसा मेस्सी आणि एंटोनेला आपल्या तीन मुलांसह परदेशात फिरायला जातात. एंटोनेला मेस्सीबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मेस्सी आणि एंटोनेला आपली मुलं आणि मित्रपरिवारासह स्पेनच्या एका बेटावर सुट्टीसाठी गेले होते. इथ त्यांनी आठवड्याला अडीच कोटी रुपये खर्च केले.