ब्युनोस : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर विवाहबंधनात अडकलाय. बालमैत्रिण अँटोनेला रिकुज्जोसोबत मेस्सीचं शुभमंगल पार पडलंय. अर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विवाह सोहळ्यासाठी क्रीडा आणि मनोरंजन विश्वामधील तारे उपस्थित होते. लग्नासाठी आमंत्रित विशेष पाहुण्यांमध्ये पॉप स्टार शकिरा, तिचा पती गेरार्ड पिक यांचा समावेश होता. 


या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लग्नाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर पाहुण्यांनी गजबजला असल्याने सामान्य नागरिकांसाठी रहदारी बंद करण्यात आली होती. वेडिंग ऑफ द सेंच्युरी म्हणून या सोहळ्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.