Lionel Messi Retirement : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 2022 मध्ये होणारा फुटबॉल वर्ल्डकप हा त्याची शेवटची मोठी स्पर्धा असल्याचे मेस्सीने जाहीर केलंय. म्हणजेच या वर्ल्डकपनंतर तो कधीही निवृत्त होऊ शकतो, कारण त्यानंतर पुढील विश्वचषक 4 वर्षांनीच होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जेंटिना टीमचा कर्णधार लिओनेल मेस्सीने हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप असेल असं सांगितलंय. एका मुलाखतीत, जेव्हा त्याला विचारलं गेलं की हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप आहे, तेव्हा तो म्हणाला की, हो, हा अगदी शेवटचा आहे. 


2022 नंतर पुढचा फुटबॉल वर्ल्डकप 2026 मध्ये होईल आणि तेव्हा लिओनेल मेस्सी 39 वर्षांचा असेल. यामुळेच त्याने शेवटचा वर्ल्डकप आधीच पक्का केला आहे.


35 वर्षीय लिओनेल मेस्सीने म्हणाला की, मला आशा आहे की, वर्ल्डकपपूर्वी माझा सिझन चांगला जाईल. ही माझी पहिली वेळ नव्हती, मी दुखापतीतून कमबॅक केलंय. आणि आता मला बरं वाटतंय. आता मी वर्ल्डकपचे दिवस मोजतोय. ही वस्तुस्थिती आहे की, जसजसा वेळ जवळ येतेय अस्वस्थता वाढतेय.


लिओनेल मेस्सीने सांगितलं की, हा शेवटचा वर्ल्डकप आहे, त्यामुळे सर्वकाही चांगलं व्हावं अशी इच्छा आहे. एकीकडे तो वाटंही पाहतोय आणि दुसरीकडे तो खूप नर्वस आहे.


मेस्सी रेकॉर्डचा बादशहा 


लिओनेल मेस्सीची गणना सध्याच्या काळातच नव्हे तर सर्वकालीन महान फुटबॉलपटूंमध्येही केली जाते. त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिनासाठी 90 गोल केलेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम ख्रिस्तियानो रोनाल्डो (117 गोल) याच्या नावावर आहे.