FIFA World Cup Final : फिफा वर्ल्डकपचा फायनल (FIFA World Cup) सामना रविवारी खेळला जाणार आहे. 18 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार, रात्री 8.30 वाजता अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स (Argentina vs France) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र अनफीट असूनही मेस्सी फायनलच्या सामन्यात उतरणार असल्याची चर्चा रंगलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनल सामन्याच्या 1 दिवस अगोदर लियोनेल मेस्सीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केलाय. यामध्ये तो फुटबॉल स्टेडियममध्ये असून सामना खेळण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. या फोटोला कॅप्शन देताना म्हटलंय की, I’m ready. Let’s go, Argentina!!" मेस्सीच्या या पोस्टवरून तो उद्याच्या सामन्यासाठी अनफीट असूनही खेळणार असल्याचं, चाहते म्हणतायत. 



रिपोर्टनुसार, अर्जेंटींनाचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार लियोनेल मेस्सी फायनल सामन्यासाठी फीट नाहीये. वर्ल्डकपच्या फायनल सामन्यापूर्वी झालेल्या ट्रेनिंग सेशनमध्ये मेस्सीने सहभाग घेतला नव्हता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो ट्रेनिंग सेशनमध्ये नव्हता. 


मेस्सीला नेमकं काय झालंय?


क्रोएशियाविरोधातील सामन्यातच मेस्सी (lionel messi) हॅमस्ट्रिंगमुळे काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच गुरुवारी संपूर्ण टीम सराव करत असताना मेस्सी मात्र त्यात कुठेच दिसला नाही. त्यामुळं तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं त्रस्त असल्याचं उघड झालं. त्याचवेळी चाहत्यांच्या मनात फायनसाठी मेस्सी मैदानात उतरणार की नाही याबाबत प्रश्न होतं.


मेस्सीकडे इतिहास रचण्याची संधी


जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या लियोनेल मेस्सीकडे आपल्या टीमला चॅम्पियन बनवण्याची मोठी संधी आहे. मुख्य म्हणजे, मेस्सीसाठी ही लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्यामुळे अर्जेंटीनासाठी त्याचा हा शेवटचा सामना असू शकतो.


अर्जेंटींनाच्या टीमने आतापर्यंत सहावेळा वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. तर दोन वेळा या टीमने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. 1978 आणि 1986 या दोन वर्षी अर्जेंटीनाच्या टीमने वर्ल्डकप जिंकला होता. फान्सच्या टीमची गोष्ट असेल तर या टीमने देखील आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. ज्यामध्ये 1998 आणि 2018 या वर्षांचा सामवेश आहे. दोन्ही टीम त्यांच्या तिसऱ्या खिताबासाठी लढणार आहे.