Lionel Messi jersey: फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाने विजय मिळवला होता. या ऐतिहासिक सामन्यात स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीने वापरलेल्या सहा ‘जर्सीं’चा लिलाव करण्यात येणार आहे. यामधून एक कोटी डॉलरहून जास्त म्हणजेच जवळपास 83 कोटी रुपये अधिकची रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मेस्सीची ही जर्सी कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेस्सीच्या फिफा वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करणारी संस्था सॉथबेनुसार, अर्जेंटिनाच्या कर्णधाराने घातलेल्या सात जर्सींपैकी सहा न्यूयॉर्क येथे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत, यामध्ये वर्ल्डकप फुटबॉलच्या अंतिम सामन्यातील जर्सीचाही समावेश आहे. 


मेस्सी फुटबॉलच्या इतर खेळाडूंप्रमाणे प्रत्येक सामन्याच्या अखेरीस प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूसोबत आपल्या जर्सीचा अदलाबदल करतो. त्यावेळची ही जर्सी फॅन्ससाठी मौल्यवान वस्तू असणार आहे.


‘फिफा’ वर्ल्डकप फुटबॉलच्या अंतिम सामन्यात निर्धारित आणि नंतर अतिरिक्त वेळेत सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. मग, पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला नमवत अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावला. मेसीने या सामन्यात दोन गोल झळकावले होते. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे अर्जेन्टिनाला फिफा वर्ल्ड कपवर नाव कोरता आलं होतं.


7 पैकी 6 जर्सींचा होणार लिलाव


साथबे यांनी सोमवारी सांगितलं की, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेलने घातलेल्या केलेल्या सातपैकी सहा जर्सी कतारमध्ये न्यूयॉर्कमध्ये विक्रीसाठी ठेवणार आहोत. फ्रान्सविरुद्धच्या फायनलमधील ऐतिहासिक विजयावेळी त्याने परिधान केलेल्या जर्सीचाही यात समावेश आहे. 


नुकताच जिंकला मेस्सीने बॉलन डी'ओर


दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकाताच बॉलन डी'ओर पुरस्कार जिंकला. मेस्सीला आठव्यांदा बॉलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॉलन डी'ओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी पहिला SLS खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम यांनी मेस्सीला हा सन्मान दिला आहे. लिओनेल मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे.