नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इसिसनं जाहीर केलेल्या पोस्टरवर बार्सिलोनाचा स्टार फुटबॉल खेळाडू लियोनल मेसीचा फोटो आहे... तो एका तुरुंगात असल्याचं या फोटोत दिसतं आणि या फोटोत त्याच्या डोळ्यांत रक्तांचे अश्रूही दिसत आहेत. 


या पोस्टरद्वारे इसिसनं वर्ल्डकप दरम्यान दहशतवादी हल्ल्याची सरळ सरळ धमकी दिलीय. 


रशियामध्ये होणाऱ्या टूर्नामेंटपूर्वी दहशतवाद निर्माण करणाऱ्या इसिसशी संबंधित असणाऱ्या 'वाफा फाऊंडेशन'नं हे पोस्टर जाहीर केलंय. त्यावर अरबी आणि इंग्रजी भाषेत धमकी देणारे संदेशही आहेत. 


'जस्ट टेरेरिजम' अशी टॅगलाईन या पोस्टरखाली देण्यात आलीय. 'तुम्ही एका अशा स्टेटशी लढत आहात ज्याच्या डिक्शनरीमध्ये अपयश नावाचा शब्द नाही' असंही त्यावर लिहिण्यात आलंय. 


ही धमकी म्हणजे, रशियाद्वारे सीरिया आणि इराकच्या जिहाद्यांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्यूत्तर मानलं जातंय. 


महत्त्वाचं म्हणजे, २०१८ साली रशियातील ११ शहरांमध्ये १४ जून ते १५ जुलैपर्यंत फिफा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपचा शेवटचा सामना मॉस्कोमध्ये खेळला जाईल.