IND vs BAN : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup चा 35 वा सामना भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळला जात आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सेमीफायनलचं (Semi Final) तिकीट कन्फर्म करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे बांग्लादेश रेसमध्ये कायम राहण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, रोमांचक सुरू असलेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने प्रथम फलंदाजी करत 184 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेशने 7 ओव्हरमध्ये 66 धावा केल्या आहे. आत्तापर्यंत एकही विकेट मिळवता आली नसल्याने रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय. पावसामुळे मॅच पुन्हा सुरू न झाल्यास भारताचं गणित फिसकटणार आहे.


कसं ते पाहूया...


पावसानंतर मॅच सुरू झाली नाही तर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे बांग्लादेशला विजयी घोषित केलं जाईल. कारण नियमाप्रमाणे 7 ओव्हरमध्ये 49 धावा करणं गरजेच्या होत्या आणि बांग्लादेशने 66 धावा म्हणजे 17 धावा अधिक केल्या आहेत. त्यामुळे आता भारताचं गणित पावसाने फिसकटवलं आहे.


दरम्यान, पहिल्या डावात भारतीय संघाने आक्रमक फटकेबाजी केली. त्यावेळी विराट कोहलीने (Virat Kohli) ताबडतोब 64 धावा कुटल्या आणि संघाला 184 च्या धावसंख्येवर पोहोचवलं.