बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावावर असेल. या लिलावात एकूण 578 खेळाडू आहेत. ज्यांच्यावर बोली लागणार आहे. ज्यामध्ये 244 कॅप्ड खेळाडू आहेत. त्यापैकी 62 भारतीय आहेत. 332 अनकॅप्ड खेळाडूंमध्ये 34 विदेशी खेळाडू आहेत.



- पृथ्वी शॉला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1 कोटी 20 लाख रुपयांना घेतलं विकत


- सिद्धेश लाडवर कोणीच नाही लावली बोली


- मनन वोहराला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 1 कोटी 10 लाखांना घेतलं विकत


- राहुल त्रिपाठीला राजस्थान रॉयल्सने 3 कोटी 40 लाखांना घेतलं विकत


- हिमांशू राणाला कोणीही नाही घेतलं विकत


- मयंक अग्रवालवर किंग्ज इलेव्हन पंजाबने लावली 1 कोटींची बोली


- रिकी भुईला सनरायझर्स हैदराबादने 20 लाखांना घेतलं विकत


- इशांक जग्गीला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाखांना घेतलं विकत


- शुबनम गिलला कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी 80 लाखांना घेतलं विकत


- सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सने 3 कोटी 20 लाखांना घेतलं विकत


- कुलदीप यादवला कोलकाता नाईट रायडर्सने 5 कोटी 80 लाखांना घेतलं विकत


- अॅडम झम्पावर कोणीही नाही लावली बोली


- यजुवेंद्र चहलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 कोटींना केलं खरेदी


- सॅम्युअल बद्रीवर कोणीही नाही लावली बोली.


- अमित मिश्राला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 4 कोटी रुपयांना केलं खरेदी


- रशीद खानला सनरायझर्स हैदराबादने 9 कोटींना केलं खरदी.


- कर्ण शर्माला चेन्नई सुपर किंग्जने 5 कोटींना केलं खरेदी.


- इश सोधीवर कोणीही नाही लावली बोली.


- इम्रान ताहिरला चेन्नई सुपर किंग्जने 1 कोटींना केलं खरेदी.


- पियुष चावलाला कोलकाता नाईट रायडर्सने 4 कोटी 20 लाखांना केलं खरेदी


- लसिथ मलिंगाला कोणत्याही टीमनं नाही केलं खरेदी


- कॅगिसो रबाडाला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 4 कोटी 20 लाखांना केलं खरेदी.


- मिचेल मॅक्लंघनवर कोणीही नाही लावली बोली


- मोहम्मद शमीला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 3 कोटींना केलं खरेदी


- इशांत शर्माला कोणाही नाही केलं खरेदी


- टीम साऊथीवर देखील कोणीही नाही लावली बोली


- उमेश यादवला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 4 कोटी 20 लाखांना केलं खरेदी


- पॅट कमिन्सला मुंबई इंडियन्सने 5 कोटी 40 लाखांना केलं खरेदी


- जोश हेझलवूडवर कोणीही नाही लावली बोली.


- मिचेल जॉन्सनवर कोणीही नाही लावली बोली.


- मुस्ताफिजुर रहमानला मुंबई इंडियन्सने 2 कोटी 20 लाखांना केलं खरेदी


- जॉस बटलरला राजस्थान रॉयल्सने 4 कोटी 40 लाखांना केलं खरेदी


- सॅम बिलिंग्सवर कोणीही नाही लावली बोली.


- अंबाती रायडूला चेन्नई सुपर किंग्जने 2 कोटी 20 लाखांना केलं खरेदी


- संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी रुपयांना केलं खरेदी


- रॉबिन उथप्पाला कोलकाता नाईट रायडर्सने 6 कोटी 40 लाखांना केलं खरेदी


- नमन ओझावर कोणीही नाही लावली बोली.


- दिनेश कार्तिकला कोलकाता नाईट रायडर्सने 7 कोटी 40 लाखांना घेतलं विकत


- जॉनी बेअरस्टोवर कोणीही नाही लावली बोली.


- रिद्धीमान साहाला सनरायझर्स हैदराबादने 5 कोटींना केलं खरेदी


- क्विंटन डी कॉकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2 कोटी 80 लाखांना केलं खरेदी 


- दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला बंगळुरुने 2.8 कोटींना घेतलं विकत


- पार्थिव पटेलवर कोणीच नाही लावली बोली


- मोईन अलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 1 कोटी 70 लाखांना घेतलं विकत


- मार्कस स्टॉईनिसला किंग्ज इलेव्हन पंजाबने 6 कोटी 20 लाखांना घेतलं विकत


- स्टुअर्ट बिन्नीला राजस्थान रॉयल्सने 50 लाखांना घेतलं विकत


- कॉलिन मुन्रोला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1 कोटी 90 लाखांना घेतलं विकत


- युसूफ पठाणला सनरायझर्स हैदराबादने 1 कोटी 90 लाखांना घेतलं विकत


- जेम्स फॉकनरवर कोणीही नाही लावली बोली.


- कोलिन डी ग्रँडहोमला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2 कोटी 20 लाखांना घेतलं विकत


- केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्जने 7 कोटी 80 लाखांना घेतलं विकत


- शेन वॉट्सनला चेन्नई सुपर किंग्जने 4 कोटींना घेतलं विकत


- कार्लोस ब्रेथवेटला सनरायझर्स हैदराबादने 2 कोटींना घेतलं विकत


- ख्रिस वोक्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 7 कोटी 40 लाखांना घेतलं विकत


- मार्टिन गप्टीलवर कोणीही नाही लावली बोली


- मनीष पांडेला सनरायझर्स हैदराबादने 11 कोटींना घेतलं विकत


- हाशिम अमलावर नाही लागली बोली


- क्रिस लिनला कोलकात्याने 9.6 कोटींना घेतलं विकत


- जेसन रॉयला दिल्लीने 1.6 कोटींना घेतलं विकत


- मॅक्कुलमला RCB ने 3.6 कोटींना घेतलं विकत


- एरॉन फिंचला पंजाबने 6.2 कोटींना घेतलं विकत


- डेविड मिलरला पंजाबने 3 कोटींना घेतलं विकत


- मुरली विजयवर नाही लागली बोली.


- लोकेश राहुलला पंजाबने 11 कोटींना घेतलं विकत


- करुण नायरला पंजाबने 5.6 कोटींना घेतलं विकत


- शिखर धवनला सनराइजर्स हैदराबादने RTMने  5.2 कोटींना घेतलं विकत


- अश्विनला किंग्स इलेवन पंजाबने 7.6 कोटींना घेतलं विकत


- पोलार्डला मुंबईने RTM ने 5.4 कोटींना घेतलं विकत


- क्रिस गेलवर कोणीच बोली लावली नाही.


- बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटींना घेतलं विकत 


- फाफ डु प्लेसिसला CSK ने RTM च्या माध्यमातून 1.6 कोटींना घेतलं विकत


- रहाणेला राजस्थानने 4 कोटींना घेतलं विकत


- मिशेल स्टार्कला कोलकाता नाईट राइडर्सने 9.4 कोटींना घेतलं विकत


- हरभजन सिंहला चेन्नईने 2 कोटींना घेतलं विकत


- शाकिब अल हसनला हैदराबादने 2 कोटींना घेतलं विकत


- ग्लेन मॅक्सवेलला दिल्ली डेयरडेविल्सने 9 कोटींना घेतलं विकत


- 2.8 कोटींना दिल्ली डेयरडेविल्सने गौतम गंभीरला घेतलं विकत


- ड्वेन ब्रावोला चेन्नईने 6.4 कोटींना घेतलं विकत 


- केन विलियम्सनला हैदराबादने 3 कोटींना घेतलं विकत


- जो रुटवर कोणीच नाही लावली बोली.


- युवराज सिंहला पंजाबने 2 कोटींना घेतलं विकत


लिलावात 18 खेळाडूंवर बोली नाही लावली जाणार आहे. प्रत्येक फ्रेंचाइजीने आपल्या टीममध्ये त्यांना कायम ठेवलं आहे. ज्यामध्ये धोनी, विराट, रोहित यांचा समावेश आहे. पाहा कोण आहे ते खेळाडू


या खेळाडूंवर नाही लागणार बोली


- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूः विराट कोहली (17 कोटी ), एबी डिविलियर्स (11 कोटी), सरफराज खान (1.75 कोटी)


- चेन्नई सुपर किंग्स : महेंद्र सिंह धोनी (15 कोटी ), सुरेश रैना (11 कोटी), रवींद्र जडेजा (7 कोटी)


- मुंबई इंडियंस : रोहित शर्मा (15 कोटी), हार्दिक पंड्या (11 कोटी), जसप्रीत बुमराह (7 कोटी)


- दिल्ली डेयरडेविल्स: ऋषभ पंत (8 कोटी) क्रिस मॉरिस ( 7.1 कोटी) , श्रेयस अय्यर (7 कोटी)


- कोलकाता नाइटरायडर्स: सुनील नरेन (8.5 कोटी), आंद्रे रसेल (7 कोटी.)


- सनराइजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर (12 कोटी), भुवनेश्वर कुमार (8.5 कोटी)


- राजस्थान रॉयल्सः स्टीव स्मिथ (12 कोटी)


- किंग्स इलेवन पंजाब: अक्षर पटेल (6.75 कोटी)


कोणावर असणार नजर


बेन स्टोक्स आणि रविचंद्रन अश्विनवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. भारत आणि जगभरातील 16 टॉप क्रिकेटर्सवर सगळ्यांची नजर असणार आहे. ज्यांची बेस प्राइस 2 कोटी रुपये असेल. यामध्ये स्टोक्स, अश्विन, शिखर धवन, मिचेल स्टार्क, क्रिस गेल आणि ड्वेन ब्रावो यांचा समावेश आहे. मागच्या सीजनमध्ये 14 कोटी 50 लाखाला इंग्लंडचा टॉप ऑलराउंडर स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.