दोन धक्क्यानंतर कोहली-पुजाराचा डाव सावरण्याचा प्रयत्न
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण पहिल्या दोन्ही टेस्टप्रमाणे या टेस्टमध्येही भारताला सुरुवातीलाच धक्के बसले. ओपनर लोकेश राहुल शून्य रन्सवर तर मुरली विजय ८ रन्सवर आऊट झाला.
सुरुवातीला दोन धक्के लागल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. लंचपर्यंत भारताचा स्कोअर ४५/२ एवढा झाला आहे. चेतेश्वर पुजारा ५ रन्सवर नाबाद तर विराट कोहली २४ रन्सवर नाबाद खेळत आहे. पहिली विकेट गेल्यावर बॅटिंगला आलेल्या चेतेश्वर पुजारानं तब्बल ५० बॉल खेळल्यावर पहिली रन बनवली.
या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये रोहित शर्माऐवजी अजिंक्य रहाणेला तर रवीचंद्रन अश्विनऐवजी भुवनेश्वर कुमारला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा