कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक लगावलं आहे. विराटनं ७७ बॉल्समध्येच त्याचं शतक पूर्ण केलं. विराटच्या या शतकामुळे भारतानं २६ ओव्हरमध्येच २०० रन्सचा टप्पा ओलांडला आहे. विराटच्या या शतकामध्ये १५ फोर आणि २ सिक्सचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटला रोहित शर्माही चांगली साथ देत आहे. रोहित शर्मानंही ७५ रन्सचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीची ही वनडे क्रिकेटमधलं २९वं शतक आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडेमध्ये सचिनची ४९, पॉटिंगची ३० शतकं आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या २८ शतकांचा रेकॉर्ड विराटनं मोडला आहे.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा 


टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन फक्त ४ रन्सवर आऊट झाला.


या मॅचमध्ये भारतीय टीममधून केदार जाधव, भुवनेश्वर कुमार आणि युझुवेंद्र चहालला वगळण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी मनिष पांडे, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.


भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल.राहुल, मनिष पांडे, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर